शहरात भव्य तिरंगा रॅली संपन्न

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात वेंगुर्ला हायस्कूल, हॉस्पिटल नाका, नगरपरिषद कार्यालय, बाजारपेठ, दाभोली नाका, शिरोडा नाका, रामेश्‍वर मंदिर, पॉवर हाऊस, घोडेबांव गार्डन पर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, वेंगुर्ला हायस्कूल व बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान ‘माझी माती, माझा देश‘ या अभियानाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu