स्वातंत्र्य सेनानींच्या वारसदारांचा गौरव

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीवर तसेच शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलस्त्रोत निशाण तलाव येथे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्य सेनानी कै. गणेश महादेव गुरव यांचा मुलगा विजय गणेश गुरव यांचा सपत्नीक तसेच कै. बाळकृष्ण शिवराम पडवळ यांचा मुलगा विलास पडवळ यांचाही मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दिलीप गिरप, सुहास गवंडळकर यांसह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu