पुस्तक व स्पर्धा परीक्षा संचाचा सुयोग्य वापर करा

बॅ. खर्डेकर महाविद्यालयात ठाकरे शिवसेनेतर्फे सायन्स विभागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संच वितरणाचा कार्यक्रम ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संफ प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून संपन्न झाला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब, शहर महिला आघाडीच्या मंजुषा आरोलकर, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, युवासेना अधिकारी पंकज शिरसाट, प्राचार्य आनंद बांदेकर, प्रा.विणा दिक्षीत, वायंगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुमन कामत आदी उपस्थित होते.

    खर्डेकर महाविद्यालयातील ११ व १२ वी सायन्सच्या २० विद्यार्थ्यांना शैलेश परब व अन्य मान्यवरांचा हस्ते पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संच यांचे वितरण करण्यात आले. तर दोन गरीब विद्यार्थींना मोफत गणवेश वाटप युवासेनेचे पदाधिकारी पंकज शिरसाट यांचे हस्ते झाले. पुढीलवर्षी या महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण २०० विद्यार्थ्यांना पुस्तक संच देणार आहोत. त्यासाठी महाविद्यालयाने गरीब विद्यार्थ्यांची यादी द्यावी असे शैलेश परब यांनी सूचित केले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे वासुदेव परब, वैभव फटजी, रफिक शेख, श्रीधर पंडीत, प्रा.जे.वाय.नाईक यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या राज्यात सर्वात आघाडीवर आहे. पण काही गरीब, हुशार विद्यार्थी व विद्यार्थी पुस्तके व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांअभावी सरावांत कमी पडतात. हे जाणून वेंगुर्ल तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सुचनांनुसार खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ल्यातील उच्च निकालाची परंपरा राखणा­या बॅ.खर्डेकर महाविद्यालयातून सायन्समध्ये शिक्षण घेणा­या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घ्यावे. हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संच वितरीत करत आहोत. त्याचा उपयोग सुयोग्य करून आपले व महाविद्यालयाचे नाव रोशन करा, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संफ प्रमुख शैलेश परब यांनी केले.

Leave a Reply

Close Menu