दाभोलीत मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन

दाभोली येथे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे १४ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.  यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपसरपंच फिन्सुअनिता फर्नांडिस, ग्रा.पं.सदस्य एकनाथ राऊळ, माजी ग्रा.पं. सदस्य नरेश बोवलेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये दाभोली शाळा नं १ ते वेंगुर्ला हद्द रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (५ लाख), दाभोली शाळा नं १ ते राजापूरकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (७ लाख), दाभोली ग्रा.पं. विस्तारीकरण करणे (५ लाख), दाभोली गिरोबा मंदिर ते बंदर रोड खडीकरण व डांबरीकरण (७ लाख) यांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Close Menu