वेंगुर्ल्यात अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सेवा परीवार आणि कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळतुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथे ७ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात ६३ जणांनी लाभ घेतला. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पणही संपन्न झाले.

      डॉ.राजन शिरसाट आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला तालुक्यात एक अत्याधुनिक रुग्णवाहिका असावी जेणेकरून गरीब गरजू रुग्णांसाठी अत्यल्प खर्चात सोय होईलत्यासाठी डॉ.राजन शिरसाट यांनी मुंबईतील दात्यांशी संफ करुन आर्थिक तरतूद केली होती. त्यातून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबई येथील सर्जन अँड गायनॅकॉलॉजिस्ट डॉ.दिलीप रायचूराफिजिशियन अक्नोक्नॉलॉजीस्ट डॉ.दिलीप पवारडॉ.राजन शिरसाटभाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईप्रदेश कार्यकारणी सचिव शरद चव्हाणतालुकाध्यक्ष सुहास गवंडळकरजिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल व बाळा सावंततालुका सरचिटणीस बाबली वायंगणकरसरपंच संघटनेचे विष्णू परबमाजी नगरसेवक साक्षी पेडणेकर व  प्रशांत आपटेकवी अजित राऊळतुळस माजी सरपंच शंकर घारेरविद्र शिरसाटकीर्तनकार चंद्रशेखर अभ्यंकरसावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावलेमाजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंतजयंत मोंडकरसुनील नांदगावकरव्यापारी संघाचे अशोक ठोंबरेकुंभारटेंब मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेलजेष्ठ नागरिक अनंत आठलेडॉ.शिरसाटराष्ट्रसेविका समिती कोकण पांत सहकार्यवाह पद्मजा अभ्यंकरसाहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटीलविश्व हिंदू परिषदेचे मिलिंद पिंजाणीअणसुर सरपंच सत्यविजय गावडेराहुल वरस्करसायमन अल्मेडाडॉ.दर्शेश पेठेमनवेल फर्नांडिसअमोल आरोसकर यासंह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांत कांदिवली मार्फत भारत माता व शिवाजी महाराज प्रतिमा उपस्थितांना देण्यात आल्या. यावेळी डॉ. दिलीप रायचुरा व डॉ.दिलीप पवार यांचा डॉ.राजन शिरसाट यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय रेडकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu