मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलावर हल्ला

  गाडीअड्डा येथे लहान मुलावर अचानक कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. ही बाब गंभीर असून न.प.ने या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ईर्शाद शेख, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, दादा सोकटे, सुहास मांजरेकर, महेश वेंगुर्लेकर, सुदेश वेंगुर्लेकर, कृतिका कुबल आदी उपस्थित होते. न.प.तर्फे काही महिन्यांपूर्वी या मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहिम राबविली होती. परंतु वरिल घटनांवरून ती मोहिम अयशस्वी झाल्याचे निदर्शनास येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Close Menu