विज्ञान नाटिका स्पर्धेत वेतोरे हायस्कूलची ‘सावधान‘ प्रथम

वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान-नाटिकास्पर्धेत श्री सातेरी हायस्कूल वेतोरेची सावधानप्रथम, उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलची अंधश्रद्धाद्वितीय, तर पाटकर हायस्कूलची मोबाईल द हिरोया एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. वेतोरे हायस्कूलच्या एकांकिकेची निवड जिल्हास्तरावर झाली आहे. रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये घेतलेल्या या स्पर्धेत तालुक्यातून आठ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा शुभारंभ गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते झाला. यावेळी विस्तार अधिकारी सुनिता बाक्रे, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, परिक्षक सुरेंद्र खामकर, प्रा.दत्ताजी राणे, प्रा.मनिषा मुजुमदार, बी.आर.सी.च्या मृणाल ठाकूर, विनोद सावंत, सविता जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सविता जाधव, मनिषा खरात, समिर पेडणेकर, स्वप्नाली पिळणकर, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचा­यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार उज्जयनी मांजरेकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu