मठ येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचे गीत गायन

मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळा क्र.१,,३ व मठ हायस्कूलमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसाठी गीत गायन केले. तर श्रावणी धुरी हिने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर विचार मांडले. उद्घाटन फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचाचे वेंगुर्ला अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबईचे प्रकाश मठकर, माजी सरपंच तुळशीदास ठाकूर, शाळा नं.२च्या मुख्याध्यापिका सुनिता पाडगांवकर, शाळा नं.३च्या मुख्याध्यापिका चित्रा खानोलकर, मठ हायस्कूल मुख्याध्यापक एस.ए.जाधव, वीरधवल परब, माजी विद्यार्थी रोशन गावडे, गौरव मेस्त्री, कर्मचारी अनिकेत कांबळे, नरेंद्र नाईक उपस्थित होते. गीत गायन कार्यक्रमात पांडुरंग चिदरकर, अतुल वाढोकर, चित्रा प्रभूखानोलकर, अंजली माडये, स्वप्नाली कांबळी, माजी विद्यार्थीनी रश्मी सावंत यांनी भक्तिगीत, भावगीत, मराठी व हिदी चित्रपट गीत सादर करून विद्यार्थ्यांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमातील सहभागी सर्वांचा व जयप्रकाश चमणकर यांचा सत्कार करण्यात आला. निवेदन जी.एम.गोसावी यांनी तर आभार एस.बी.कांबळी यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu