रूग्णालयातील समस्या सोडविणार-डॉ.सावंत

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील दुराव्यवस्था व विविध समस्यांबाबत वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे ८ सप्टेंबर रोजी रुगणालयाच्या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे यशवंत परब, अजित राऊळ, प्रकाश गडेकर, संदेश निकम, सुमन निकम, अस्मिता राऊळ, मंजुषा आरोलकर, सुमन कामत, तुषार सापळे, संजय गावडे, अॅड.जी.जी.टांककर, रफिक बेग, संदीप पेडणेकर, सुजित चमणकर, गजाननन गोलतकर, दिलीप राणे, हेमंत मलबारी, दया खर्डे आदी उपस्थित होते. डॉ. संदिप सावंत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून येत्या ३० दिवसांत केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच रूग्णालयासाठी असलेल्या टेक्नीकल मशिनरीसाठी तंत्रज्ञ देण्यात येईल. १०२ रुग्णवाहिकेसाठी चालक मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे मागणी तसेच सफाई कामगार मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. या जिल्ह्यातील दोन सुपुत्र हे शासनात केबिनेटमंत्री असताना सर्वसामान्य जनतेस उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळू शकत नाही. हे दुर्दैव आहे. जनतेतून याबाबत तीव्र नाराजी असल्याचे मत यशवंत परब यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu