परिसंवादातून पामतेलाची माहिती विषद

बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे पाम तेलाविषयी एक दिवशीय परिसंवाद संपन्न झाला. पामतेलातील फॅटी अॅसिडस् सिरम कोलेस्ट्राॅल कमी करते. पामतेल आपल्या शरिरास आवश्यक असणारे एच.डी.एल कोलेस्ट्राॅल वाढवते. कर्करोगाचा धोका टाळते, रगप्रतिकारक क्षमता वाढवते, शरिरातील फ्री रॅडिकलस कमी करते, मेंदूचे आरोग्य चांगले ठेवते. तेलातील पोषक द्रव्य आरोग्य सुधारते, तेलामध्ये असलेले फायटो न्यूट्रीएंट, फायटोस्टेरॉल, स्कवॅलीन, टोकोफेरॉल हे रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज व रक्तवाहिन्याची जाडी कमी करते अशी माहिती मुंबई विद्यापिठाचे माजी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी.एच.मेहता यांनी दिली. पामतेल हे रंगहीन, चवहीन, स्वाद देणारे, अधिक ऑक्सिडंटअसणारे, उच्च तापमानास स्थिर रहाणारे, भांड्याला न चिकटणारे, ट्रान्सफॅटी अॅसिडमुक्त असलेले आहे असे डॉ.मीना मेहता यांनी सांगितले. तर पामतेलाचा उपयोग ८० ते ९० टक्के फुड इंडस्ट्री, कॉस्मेटिक्स, बेकरी उत्पादने, साबण, बिस्कीटमध्ये वापरले जाते. पामतेलामध्ये ओमेगा ३ व ओमगा ६ हे जास्त प्रमाणात असल्याचे प्रास्ताविकामध्ये प्रा.राजाराम चौगले यांनी सांगितले.  यावेळी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, विज्ञान विभाग प्रमुख तथा रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संजिव चमणकर, डॉ.वसंतराव पाटळे, प्राणीशास्त्र विभाग प्रा.एस.एच.माने, प्रा.राजाराम चौगले, संजय परब, प्रमोद कांबळे, विलास सणगर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu