नऊ महिलांना रणरागिणी पुरस्कार

समाजात लक्षवेधी काम करणा­या नऊ महिलांचा वेंगुर्ला भाजपातर्फे दस­याच्या शुभमुहूर्तावर ‘रणरागिणी पुरस्कार‘ देऊन महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात अनाथ बालके व महिला सक्षमीकरण क्षेत्रातील सविता कांबळी (वायंगणी), पर्यावरण क्षेत्रातील डॉ.डी.एस. पाटील (वेंगुर्ला), सामाजिक क्षेत्रातील सुजाता पडवळ (तुळस),  उत्कृष्ट आशा स्वयंसेविका वर्षा परब, यंत्र दुरुस्ती सारखा वेगळा मार्ग अवलंबून स्वतः रोजगार निर्मिती करून बेरोजगारांना प्रेरणा देणा­या करिष्मा सोनसुरकर (वजराट), हातमाग कलेचे जतन व संवर्धन करणा­या शुभांगी सावंत-भोसले (वजराट), बचत गट व योग प्रचार प्रसार करणा­या उर्वी गावडे (रामघाट), कॅटरिग व्यवसायातून व्यावसायिक संधी साध्य करणा­या पल्लवी गावडे (अणसूर), मानसिक आरोग्यावर कार्य करणा­या सहज ट्रस्टच्या अध्यक्ष मीनाक्षी अळवणी यांचा समावेश आहे. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, सुषमा खानोलकर सारिका काळसेकर, प्रार्थना हळदणकर, शितल आंगचेकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu