उद्धव ठाकरे सेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी संदेश निकम

उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते तथा खासदार विनायक राऊत व शिवसेनेचे सचिव वरुण सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ल्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या पदवीधर मतदार नोंदणी आढावा बैठकीत वेंगुर्ला शहरात २५ वर्षे नगरसेवक, अडीच वर्षे नगराध्यक्ष तसेच विषय समितीची पदे भुषविणारे आणि नागरिकांना प्रसंगाला धावून जात मदत करणारे क्रियाशील कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखपदी जाहिर निवड करण्यात आली.

      यावेळी युवा सेना सचिव विक्रांत जाधव, कोकण पदवीधर मतदार संघाचे आघाडीचे भावी उमेदवार किशोर जैन, शिवसेना समन्वयक प्रदिप बोरकर, योगेश दिप्ते, जिल्हाप्रमुख संजय पडते, समन्वयक बाळा गावडे, संफप्रमुख मालचंद्र चिपकर, सुधीर घाणे, अमित पेडणेकर, अथर्व साळवी, सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट, गितेश राऊत, रुबी राऊत, सुनिल ढाणे, एसटी आगार सेनेचे अनुप नाईक, योगेश नेमटे आदी उपस्थित होते.

      संदेश निकम हे आपत्कालीन घटनेत नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्यासाठी मित्रमंडळाच्या रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून सेवा देत असतात. कोरोना काळात परजिल्ह्यातील वेंगुर्ल्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी यशस्वी काम केले. त्यांच्या सामाजिक कार्याची व पक्षासाठी सुरु ठेवलेल्या कामाची दखल घेऊन उपजिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत शहरप्रमुख अजित राऊळ, महिला आघाडी संघटक सुकन्या नरसुले, उपतालुका प्रमुख संजय गावडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu