विद्यार्थ्यांना बचत पेटीचे वितरण

  दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये तंत्रशिक्षण विभागातर्फे व कॉज टू कनेक्ट फाऊंडेशनच्यावतीने ‘हाताला काम, श्रमाला दाम‘ अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावले जात आहेत. यातून होणा­या नफ्यातून विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी दीपावलीचे औचित्य साधून कै. वामन प्रभूखानोलकर स्मृतिप्रित्यर्थ खानोलकर परिवार (दाभोली) यांच्याकडून मुलांना बचतपेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी सुहास प्रभूखानोलकर, सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक सतिश वाळवे, तुकाराम सामंत, केतन प्रभूखानोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर गोलतकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष आत्माराम प्रभूखानोलकर, मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, वसंत पवार, दिपक पाटील, रेश्मा चोडणकर आदी उपस्थित होते. बचत पेटीमध्ये साठवलेल्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक खाते बँकेत काढले जाईल. तसेच बँक कामकाजाबाबत प्रत्यक्ष क्षेत्र भेटही घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Close Menu