धान्याच्या पोत्यात चायनीज सदृश्य पदार्थ

शासनातर्फे गोरगरीब जनतेला मोफत धान्य पुरविण्यात येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आडेली येथील धान्य दुकानात धान्य वितरणावेळी तांदूळच्या पोत्यामध्ये चायनिजसदृश्य पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत याची शासनस्तरावरून त्वरित चौकशी होऊन संबंधित धान्य पुरवठादारावर कारवाई व्हावी, अशी मागणी आडेली सोसायटीचे चेअरमन प्रकाश गडेकर यांनी केली आहे. तांदूळ पोत्यातही किडे व अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Close Menu