साहित्य प्रदर्शन व विक्री

दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत वेंगुर्ला न.प.तर्फे झुलत्या पुलानजिक ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी फराळ व इतर आकाश कंदील, पणत्या प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले. महिला बचतगटांनी बनविलेल्या घरगुती खाद्यपदार्थांना स्थानिक बाजारपेठ मिळावी व महिलांनी आर्थिक उन्नत्ती साधावी यासाठी न.प. प्रोत्साहन देत आहे.

Leave a Reply

Close Menu