दिवाळी नाईटला उत्स्फुर्त प्रतिसाद

वेंगुर्ला-पाटीलवाडा येथे दीपावली निमित्त दिवाळी नाईटकार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका प्राजक्ता परब यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, प्राची परब, वृंदा परब, बाळू परब, शेखर माडकर, दाजी सावंत, दिनकर परब आदी उपस्थित होते. यावेळी फनी गेम व विविध स्पर्धा पार पडल्या. सोलो नृत्य स्पर्धा-मोठा गट-प्रथम-आकांक्षा परब, द्वितीय-निहिरा पाटणकर, तृतीय-नूतन चौगुले, लहान गट-प्रथम-तनु परब, द्वितीय-युक्ता किनळेकर, तृतीय-चिन्मयी परब, मायलेक नृत्य स्पर्धा-प्रथम नूतन चौगुले-श्रीशा चौगुले, द्वितीय कुंदन परब-आकांक्षा परब, तृतीय-लावण्या परब-निशिता परब, चतुर्थ-प्रविणा परब-सिया परब यांनी क्रमांक मिळविला. तर महिलांसाठी खास आकर्षण असलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम-अपर्णा सावंत व द्वितीय-लावण्या परब ह्रा पैठणीच्या मानकरी ठरल्या. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक संतोष परब यांनी तर स्पर्धेचे सुत्रसंचालन अर्जुन राजगे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आकांक्षा परब, सावंत तसेच क्षणभर विश्रांती मित्रमंडळ आणि धोकमेश्वर मित्रमंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Close Menu