दाभोलीमध्ये कामगंध सापळ्याचे प्रात्यक्षिक

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३साठी  दाभोली या गावांमध्ये आलेल्या कृषिदूतांनी (गट-ड) येथील मुख्य पिकांचा अभ्यास केला. त्या पिकांवरील कीड रोग जाणून घेऊन त्यावर उपाययोजना शेतक-­यांपर्यंत पोहोचवल्या, नारळ पिकाचा अभ्यास करत असताना त्यावर गेंड्याभूंगा व सोंड्याभूंगा याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला. यावर शेतक­यांना मार्गदर्शन आणि एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनमधून या भूंग्यांसाठी दादा हळदणकर यांच्या नारळ बागेत कामगंध सापळ्याचे प्रात्यक्षिक घेतले व त्याचा उत्तम निकाल दिसून आला. या सापळ्यामध्ये साधारणतः २२ भुंगे पकडले गेले व नारळ बागेतील प्रादुर्भाव कमी दिसून आला. दरम्यान, दाभोली येथे उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे कृषिदूत गट ‘ड‘ मार्फत कृषिमेळावा घेण्यात आला व त्यामध्ये महाविद्यालयाचे किडरोगतज्ज्ञ डॉ.गुरव यांनी नारळ पिकावरील कीड रोग नियंत्रणावर, तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.राजन खांडेकर यांनी इतर पिकांवरील कीड रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Close Menu