शेतकर्‍यांना अळंबी लागवडीचे प्रात्यक्षिक

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथील ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम २०२३ साठी दाभोली गावाची निवड केली. या गावात आलेल्या कृषिदूत गट ‘ड‘च्या मुलांनी गावात अनेक नवीन तंत्रज्ञान व शेती संदर्भात प्रात्यक्षिके घेतली. यामध्ये अळंबी लागवडीचे प्रात्यक्षिक विकास जोशी यांच्या घरी घेतले व ते यशस्वी करून दाखवले. या कालावधीत फक्त पावसाळ्यामध्ये येणारी ही अळंबी या मुलांनी पावसाळा नसताना कशी घेतली याबाबत शेतक­यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. ही उत्सुकता आणि शेती-बागायती बद्दल माहिती देण्यासाठी  कृषिदूत गट ‘ड‘ यांनी दाभोली मध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात अनेक शेतकरीवर्ग व महिला बचत गटसहभागी झाला होता. या मेळाव्यात उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा.डॉ.परेश पोटफोडे यांनी अळंबी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखवले व माहिती दिली. या कार्यक्रमाला गावक­यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी शुभम घवाळी, तेजस कणेरकर, जोबिन सलीन, सौरभ सैद, साईनाथ शिंदे व चैतन्य गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Close Menu