केंद्रीय मराठी साहित्य संमेलन मॉरिशस येथे संपन्न

 मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालय, मॉरिशस, मराठी फेडरेशन मॉरिशस, मराठी कलाकार सेंटर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय मराठी साहित्य संमेलन 2 व 3 डिसेंबर रोजी मॉरिशस येथे संपन्न झाले. यावेळी विविध विषयांवर परिसंवाद, कवी संमेलने, मराठी संस्कृतीची सांस्कृतिक झलक दाखविणारे कार्यक्रम आणि मॉरिशस येथे राहणारे साहित्यिक व साहित्य प्रेमी यांचा संयुक्तरित्या साहित्यिक जागर घडला. या संमेलनामध्ये मॉरिशस व महाराष्ट्रातील लेखकांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

      सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक उषा परब यांच्या भरारी प्रकाशन, मुंबई यांनी अलीकडेच प्रकाशित केलेल्या स्वरसम्राज्ञी व इतर एकांकिका या संग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, कोमसापचे प्रमुख विश्‍वस्त रमेश कीर, प्रकाशक लता गुढे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, लेखिका उषा परब यांसह मॉरिशस मराठी स्पीकिंग फेडरेशनचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक उषा परब यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu