प्रा. अविनाश बापट यांच्या कादंबरीला शांता शेळके पुरस्कार

कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान, मंचर-पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा शांता शेळके उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्रा.अविनाश विनायक बापट यांच्या मालवणी बोली भाषेतील ‘खलाटी वलाटी‘ या कादंबरीला नुकताच जाहीर झाला आहे. प्रा. अविनाश बापट यांनी कथा, कविता, कादंबरी ललित लेख अशा साहित्य प्रकारात मिळून २४ पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी त्यातील सात पुस्तके मालवणी बोली भाषेतील आहेत दूरदर्शनवर ‘अक्षरांच्या वाटेवर‘ या सदरात ‘डीडी सह्याद्री‘वर एक तासाची मुलाखत झाली आहे. या पुरस्काराबद्दल प्रा. बापट यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu