महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाचे ३३वे सिधुब्रह्म संमेलन २० व २१ जानेवारी रोजी वाटवे बंधू यांचे श्री शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी येथे संपन्न होणार आहे. दि.२० रोजी दु.३ वा. उद्घाटन, ३.३० वा. ‘आर्य चाणक्य आणि शिक्षण निती‘ यावर व्याख्यान, ४.३० वा. जिल्हास्तरीय गायन, पठण स्पर्धा व कुडाळ तालुकास्तरीय पाककला व रांगोळी स्पर्धा विजेत्यांचे बक्षिस वितरण, सायं. ५ वा. स्वरसंध्या, रात्रौ ९ वा. सिधुदुर्गातील ब्रह्मवृंदांचा ट्रिकसिनयुक्त ‘अंतरीक्ष सम्राट‘ हे दशावतारी नाटक, दि.२१ रोजी स. ९.३० वा. तालुका व जिल्हास्तरीय सन्मान, १० वा. ‘श्री समर्थ रामदास -एक काल सुसंगत उद्योजक‘ यावर व्याख्यान, ११.३० वा. विद्यागौरव व जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण, १२.१५ वा. राजाराम चिपळूणकर यांचे अध्यक्षीय मनोगत, दु.२.३० वा. ब्रह्मयुवा मंच व साहित्य समिती कार्यक्रम होणार आहे.