नेहमी सकारात्मक विचार करा-आनंद म्हसवेकर

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात १५ जानेवारी रोजी नाट्यलेखक, दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचा आनंदाचे डोही आनंद तरंगहा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर कलावलय अध्यक्ष सुरेंद्र खामकर, संजय पुनाळेकर, सुनील रेडकर, पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, प्राचार्य एम.बी.चौगुले उपस्थित होते.

     आपल्या संत परंपरेने मनावर आधारित अनेक साहित्य लिहून ठेवलेले आहे तरीही आपला मनावर आपला संयम नसल्यामुळे अनेक व्याधी उत्पन्न होतात. म्हणूनच मनाला शिस्त लावावी लागते. मन निरोगी असेल तर आपले आयुष्य चैतन्यमय होऊन जाते. यासाठी सकारात्मक विचार आपल्या आतल्या मनाला सातत्याने करायला भाग पाडणे गरजेचे असते. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सर्वांच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात चढ-उतार हे असतातच. संकटे ही असतात. परंतु आपल्या मनाला सकारात्मक सूचना दिल्यास आपल्या आयुष्यात आपण इच्छिलेल्या तशा संधीही उपलब्ध होतात. तेव्हा त्या संधीचा फायदा करून घेताना मनाला काबूत ठेवून ते ध्येय साधण्याच्या दिशेने पाऊल टाका. तुम्ही यशस्वी होणारच. आयुष्यात वाट्याला आलेले यश आणि अपयशाची कारणे सकारात्मकरित्या विचार केल्यानंतर सकारात्मक शक्ती व मनातील ऊर्जा यामुळे जगातील कोणताही माणूस स्वतःचे जीवन कसे समृद्ध करू शकतो हे आपल्या उदाहरणातून ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी केले.

     मराठी विभाग प्रमुख प्रा.वामन गावडे यांनी कलावलयचे अध्यक्ष बाळू खामकर हे नेहमीच कलावलयतर्फे विद्यार्थ्यांसाठी उत्तमोत्तम कार्यक्रम आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, नाटककार आनंद म्हसवेकर यांच्या यशस्वी जीवनाचा आढावा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.   

    नयना आपटे यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, आयुष्य म्हटल्यानंतर अडचणी या येणारच. पण अडचणी येतात त्या आपल्यातील क्षमता तपासण्यासाठी असा विचार करून नेहमी सकारात्मक रहा व त्यादृष्टीने खचून न जाता पुन्हा उभे रहा. तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी नक्की व्हाल असे सांगत आपले अनुभव व्यक्त केले. शशांक मराठे यांनी कार्यक्रमाचे निवेदन तर आभार प्राचार्य एम.बी.चौगुले यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu