स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ला न.प.प्रथम

वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणा­या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा , महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ला शहरास जीएफसी १ स्टार व  ग्र्क्क अअ  मानांकन प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले असल्याचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu