म्हाडा वसाहतीमध्ये ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘

  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते संपूर्ण स्वच्छता मोहिमराबविण्यात आली. त्याचाच भाग म्हणून १७ जानेवारी रोजी वेंगुर्ला न.प.व म्हाडा वसाहतीतील रहिवाशांतर्फे म्हाडा परिसरामध्ये संपूर्ण स्वच्छता मोहिमराबविण्यात आली. यात प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल, कागद, कापड, चपला, थर्माकोल वर्गीकृत करून संकलित केला. ग्रासकटरच्या सहाय्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेले गवत, झाडी तसेच रस्ते झाडून स्वच्छ केले. तर गटारेसुद्धा साफ केली. परिसरातील अनधिकृत बॅनर, फलक व जाहिराती हटविण्यात आल्या. रस्ते धूळ मुक्त करण्यासाठी वॉटर टँकरच्या सहाय्याने रस्ते धुण्यात आले. नाल्यांच्या प्रवाहातील गाळ काढून त्यातील सांडपाण्याचा पुनर्वापर करून नाले साफ करण्यात आले.

 

Leave a Reply

Close Menu