मिडियाबाबत जाणून घेतली विद्यार्थ्यांना माहिती

क्षेत्रीय भेट उपक्रमांतर्गत बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील हिदी व मराठी वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी १६ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील किरातया शतकोत्तर पार केलेल्या मुद्रणालयाला भेट देऊन प्रिट मिडिया व इलेक्ट्राॅनिक मिडियाबाबत माहिती जाणून घेतली. किरातमुद्रणालयाचे व्यवस्थापक सुनिल मराठे यांनी ऑफसेट प्रिटीग कशाप्रकारे चालते याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

    तर साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी साप्ताहिक वृत्तपत्र कसे बनविले जाते याची तसेच डिजिटल प्रिटींगबाबत माहिती दिली. यावेळी हिदी विभागाचे प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर व मराठी विभागाचे डॉ.पी.आर.गावडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu