२२ जानेवारी ऐतिहासिक क्षण

सिंधुसंकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंटयांच्या संयुक्त विद्यमाने नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात १५ जानेवारी रोजी अयोध्याया महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोकण राष्ट्रीय स्वयंसवक संघाचे सहसंचालक  बाबा चांदेकर, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष बाळू देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लवू महाडेश्वर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, युवा नेते भाई सावंत, भाजपाचे संध्या तेरसे, सुहास गवंडळकर,वारकरी संप्रदायाचे सावळाराम कुर्ले, भागवत प्रबोधिनिचे संजय पुनाळेकर, निर्माते प्रणय तेली आदी उपस्थित होते.

   २२ जानेवारी रोजी आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पुढे जात आहोत. राम म्हणजे मंगलमय, पवित्र्याचे, सद्गुणांचे, समर्पणाचे वातावरण प्रभू रामचंद्रांनी जे आदर्श प्रस्थापित केले त्या मार्गांवर आपण चाललो तर ख­या अर्थाने आपण रामराज्याचे पाईक ठरू, असे प्रतिपादन बाबा चांदेकर यांनी केले. प्रणय तेली यांनी अयोध्या महानाट्याबाबत रूपरेषा स्पष्ट केली. आत्माराम बागलकर, गजानन दामले या प्रातिनिधीक कारसेवकांचा शाल, श्रीफळ व राममंदिरची प्रतिमा देऊन तसेच उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रसन्ना देसाई यांचा सन्मान केला. प्रास्ताविक मयूर खानोलकर, सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu