वेंगुर्ले तालुका रामनामाने बनला भक्तीमय..

अयोद्धेतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी वेंगुर्ला तालुका रामनामाने भक्तीमय बनला. गेले काही दिवस हा दिवस साजरा करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू होती. सोमवारी तालुक्यातील 47 ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये रामरक्षा स्तोत्र पठणे, प्रभू श्रीराम यांचे पूजन त्यानंतर नामसंकीर्तन, भजन, आरती, महाप्रसाद, दशावतारी नाटक, गायन असे विविध कार्यक्रम सादर झाले. वेंगुर्ला रामेश्‍वर मंदिरात, मोचेमाड येथील गिरोबा मंदिर येथे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आला. तर सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला. भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात सकाळपासूनच नामजप आणि सायंकाळी गायनाचा सुश्राव्य कार्यक्रम झाला. रवळनाथ मंदिर, चांदेरकर विठ्ठल मंदिरात भाविकांना खिचडी, महाप्रसाद देण्यात आला. रवळनाथ रिक्षा स्टॅण्ड व राम भक्तांनी मिळून श्रीरामाची फेरी काढली. गाडीअड्डा तांबळेश्‍वर मंदिर, गाडीअड्डा परिसरात दीपोत्सव करण्यात आला. उसपकर विठ्ठल मंदिर उभादांडा येथे पूर्णदास उसपकर विरचीत आत्मरामायण ग्रंथाचे वाचन, अभंग गायन तसेच उभादांडा आई नरसुले मंदिरातही विविध कार्यक्रम संपन्न झाले.

Leave a Reply

Close Menu