वेंगुर्ला बसस्थानक प्रथम

हिदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत पहिल्या रत्नागिरी, दुस­या कोल्हापूर व तिस­या सांगली जिल्ह्याच्या समितीमार्फत झालेल्या सर्वेक्षणात वर्गात मोडणा­या वेंगुर्ला बसस्थानकाने मुंबई प्रदेश विभागात मुंबई प्रदेश विभागात तिन्ही समित्यांच्या सर्वेक्षणात सरासरी ७१ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला असून हे बसस्थानक बक्षिसास पात्र ठरले आहे. या सर्वेक्षणात सावंतवाडी बसस्थानक ५७ गुण, बांदा ५२, आंबोली ५२, दोडामार्ग ५४, मालवण ५९, कणकवली ६०, खारेपाटण ६१, फोंडा ५७, तळेरे ५३, वैभववाडी ५५, देवगड ६८, विजयदुर्ग ३४, कुडाळ ५१, कसाल ५३, कुडाळ जुना ५३, सिधुदुर्गनगरी ५७, शिरोडा ५९ असे गुण मिळाले आहेत. वेंगुर्ल्याच्या या यशात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण वेतुरकर, प्रवासीमित्र प्रा.वैभव खानोलकर, कर्मचारी, प्रवासी, नागरिक व पत्रकारांचे सहकार्य मिळाली असल्याची माहिती वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहूल कुंभार यांनी दिली. 

Leave a Reply

Close Menu