फुलकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यात किटकनाशके कुचकामी!

सद्यस्थितीमध्ये कोकण विभागातील बहुतांशी आंबा बागांमध्ये फुलकिडी (थ्रीप्स) चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्या बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही कीटकनाशक फुलकिडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी दिसून येत नाही. त्यामुळ फुलकिडीच्या नियंत्रणासाठी बाजारपेठेत उपलब्ध प्रभावी असलेली किटकनाशके वापरून प्रायोगिक प्रक्षेत्र प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत. शेतक­यांना मार्गदर्शन तसेच फुलकिड व्यवस्थापनासाठी शेतकरी मेळावे, चर्चासत्रे आयोजित करून जनजागृती व शास्त्रीय पद्धतीने कीटकनाशकांचा अभ्यास सुरू करण्यात आल्याची माहिती वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.महेंद्र गव्हाणकर यांनी दिली.

      किडीच्या व्यवस्थापनासाठी विद्यापिठामार्फत स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही २.५ मिली किवा थायेमेथाक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही किटकनाशके लेबल क्लेम नाहीत. ज्या शेतक-याने  आवश्यकतेनुसार व एकाच किटकनाशकाचा फवारणीसाठी वापर केला आहे. अशा बागांमध्ये किटकनाशकाचा अतिवापर किवा २ ते ४ किटकनाशके मिसळून फवारणी केल्या जातात. अशा बागेत फुलकिडीचा प्रादुर्भाव हा नियंत्रणात दिसून येत नाही. या बागांचे सर्वेक्षण केले असता त्या बागांमध्ये किट-कनाशकांच्या अतिवापरामुळे फुलकिडी मध्ये किटकनाशकांप्रति प्रतिकारक्षमता वाढल्याचे व त्या किडीची प्रजनन क्षमता वाढून आल्यामुळे किटकनाशकांचा त्या किडीवर अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. आंबा पिकावर पिवळ्या व काळ्या अशा दोन प्रकारच्या फुलकिडीच्या प्रजाती दिसून येत असल्यामुळे त्याबाबत सर्वेक्षण करून ह्या किडीचे नमुने गोळा करून त्यांच्या प्रजातीमध्ये कोणता अनुवंशिक बदल झाला आहे का याबाबत विद्यापिठामार्फत अभ्यास सुरू करण्यात आला असून प्रजातीची ओळख व वर्गीकरण केल्यानंतर याबाबत स्पष्ट कल्पना येऊ शकेल.

      सद्यस्थिती पाहता आंब्यावरील फुलकिडीचा प्रभावी व्यवस्थापनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबट, दापोली व गोळप रत्नागिरी तसेच सिधुदुर्गातील आचरा, मालवण व फणसे देवगड येथे फुलकिडींच्या नियंत्रणासाठी बाजारपेठेत इतर पिकांवर फुलकिडीसाठी प्रभावी असलेली किटकनाशके वापरून प्रायोगिक प्रक्षेत्र चाचणी प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली असून या हंगामाअखेर त्याचे निष्कर्ष उपलब्ध होऊ शकतील. गोळप येथील प्रक्षेत्र चाचणी प्रयोग प्रात्यक्षिकामध्ये वापरण्यात आलेल्या किटकनाशकांचे आशदायक निष्कर्ष प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu