रेडी यशवंतगड संवर्धनासाठी ९ कोटींचा निधी मंजूर

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन वित्तमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी ३०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतच्या १०३ कोटीच्या पुरवणी मागणीस मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शिवकालीन किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील यशवंत गडासाठी ९ कोटी १६ लाख ३१ हाजार ३४९ रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  ९ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाने या किल्याच्या जतन व दुरूस्तीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शिवकालीन ऐतिहासिक किल्ल्याला पुन्हा एकदा झळाळी मिळणार आहे.

   यशवंतगड किल्ला ते शिरोडा वेळागरपर्यंत झुलता पूल झाल्यास पर्यटनाला खूप चालना मिळेल. त्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव पर्यटन उपसचिवांकडे सादर केला असून पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनीही पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती जि.प.चे माजी सदस्य प्रितेश राऊळ यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu