शिक्षणमंत्री चॅम्पियनशिप एम.आर.देसाई इंग्लिश स्कूलला

दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या येथील शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या संजय मालवणकर स्मृती शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सवातील विविध स्पर्धांना जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालवाडी ते खुल्या गटात विद्यार्थी व पालकांसाठी घेतलेल्या बडबडगीत, श्लोक पाठांतर, फॅन्सी ड्रेस, सवेश अभिनय, रंगभरण, बालकुमार चित्रकला, बालनृत्य, एकेरी नृत्य, मॅरेथॉन, माय-लेकरू नृत्य व समूहनृत्य स्पर्धेत तब्बल १३२० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

    महोत्सवात घेतलेल्या विविध स्पर्धांमधील प्रथम पाच पुढीलप्रमाणे- बडबडगीत गायन स्पर्धा गट बालवाडी – शौर्य धुरी, तनीशा सातार्डेकर, ईश्वरी गवळी, ओजस्वी वेंगुर्लेकर, अनन्या नंदगिरीकर. स्पर्धेचे परिक्षण बाळू खामकर व संध्या खामकर यांनी केले. श्लोक पाठांतर स्पर्धा – गटबालवाडी-महंत शेर्लेकर, तन्वी केळुसकर, अनन्या नंदगिरीकर, तन्मय राऊळ, कृष्णा पाटील. पहिली ते चौथी गट – ज्ञानेश्वरी तांडेल, आर्या वेंगुर्लेकर, दुर्वा सोन्सुरकर, केदार आपटे, आर्या सोन्सुरकर. स्पर्धेचे परीक्षण आत्माराम बागलकर, बाबूराव खवणेकर व सीमा मराठे यांनी केले. फॅन्सी ड्रेस स्पर्धा-गट बालवाडी-सिराज कोंडुसकर, श्रीयांत किनळेकर, पुनर्वी दळवी, प्राप्ती मोरे, मनस्वी पालकर. स्पर्धेचे परीक्षण बाळू खामकर व पी.के.कुबल यांनी केले. सवेश अभिनय स्पर्धा ः गट पहिली ते चौथी – आराध्या राऊळ, प्रसन्न बर्वे, सान्वी सातार्डेकर, चिन्मय कोतेकर, आर्या साठम. गटपाचवी ते दहावी-वरदा परब, चिन्मयी परब, वीर गावडे, श्रावणी आरांवदेकर, आर्या चेंदवणकर. बालनृत्य स्पर्धा-बालवाडी -समिधा वेंगुर्लेकर, पुनर्वी दळवी, दुर्वा गवस, प्रांजल जाधव, गंश परब. पहिली ते चौथी -स्वरा पावसकर, सान्वी रजपूत, दिशम परब, गुंजन गिरप, सई राऊळ. एकेरी नृत्य स्पर्धा- पाचवी ते सातवीअभंग रगजी, सीमा चव्हाण, दुर्वा पावसकर, वैष्णवी मुननकर, भक्ती सावंत. गटआठवी ते दहावी – श्रुती शेवडे, भास्कर सांगले, दिव्या बागायतकर, युक्ती हळदणकर, समृद्धी कावडे. परीक्षण कविता राऊळ व मनाली कुलकर्णी यांनी केले. रंगभरण स्पर्धा ः गटबालवाडी-युगा खानोलकर, गिरीजा गावडे, आदिती राणे, गंधार परब, राज प्रजापती. बालकुमार चित्रकला स्पर्धा- पहिली ते चौथी-सान्वी चुडजी, सरस नाईक, हर्षल टेमकर, मोहित परब, भार्गव पालव, गट पाचवी ते दहावी-केतकी रेडकर, चिन्मय कुडपकर, प्राजक्ता शिरोडकर, गुंजन कुडपकर, निधी पेडणेकर. परीक्षण पिंट्या कुडपकर व अमोल सावंत यांनी केले.

    या जागृतोत्सवात सर्वाधिक पारितोषिके पटकावून वेंगुर्ल्यातील एम. आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलने संजय मालवणकर स्मृती शिक्षणमंत्री चॅम्पियनशिप पटकाविली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

 

Leave a Reply

Close Menu