अंधश्रद्धा निर्मूलन अध्यक्षपदी शिवराम आरोलकर

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज असून गावागावांत जादू-टोणा, भोंदूबाबा, भानामती या बाबतीत सविस्तर माहिती देऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बाबतीत जनजागृती होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन  सामाजिक कार्यकर्ते व सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष अरुण मेस्त्री यांनी वेंगुर्ला तालुका येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीत केले. जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरजयावर विवेचन केले तर अंनिस जिल्हा उपाध्यक्ष डॉ संजीव लिंगवत मार्गदर्शन केले. यावेळी सर्वानुमते शिवराम आरोलकर यांची वेंगुर्ला तालुका अध्यक्ष पदी, सीमंतिनी मयेकर यांची वेंगुर्ला तालुका सचिवपदी तर स्मिता गावडे यांची तालुका संफ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक विजय चौकेकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, जिल्हा महिला संघटक रूपाली पाटील, सहसचिव संजय खोटलेकर, जिल्हा सदस्य नामदेव मठकर, जनसेवा प्रतिष्ठान सचिव डॉ.सई लिंगवत, जिल्हा सदस्य सुनील गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu