‘सिधुरत्न‘मधून रोजगारवाढीसाठी प्रयत्न

  वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, वजराट, होडावडा, तळवडे, मातोंड, आजगांव रस्ता, पूल या १ कोटी ३१ लाख १२ हजार ११८ रूपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसिलदार ओंकार ओतारी, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, उपसरपंच राजबा सावंत, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.भगत यांच्यासह अन्य उपस्थित होते.

     शेतकरी, महिलांचे उत्पन्न वाढेल या दृष्टीने सिधुरत्न योजनेतून आपण प्रयत्न करीत आहोत. मी मतदारसंघात कितीवेळा येतो, यापेक्षा मतदार संघासाठी किती काम करतो हे महत्त्वाचे आहे. २५ फेब्रुवारीला आमचा जर्मनीमधील बेडन युटरबर्ग या राज्याबरोबर करार होत आहे. यात आपल्याकडे जी टेक्निकल शिक्षण घेतलेली मुले आहेत, त्या सर्वांना जर्मन भाषा शिकवायची व त्यांना जर्मनीमध्ये नोक­या द्यायच्या आहेत. लवकरच सिधुरत्न योजनेच्या कार्यालया या मुलांची यादी करण्यात येईल अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली.   

Leave a Reply

Close Menu