वेंगुर्ला डच वखारीच्या दुरूस्ती कामाला सुरूवात

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलेल्या वेंगुर्ला डच वखारची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत होती. या पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठान, सिधुदुर्ग व कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून सातत्याने गेली १० ते १२ वर्षे पुरातत्व विभागाच्या परवानगीने स्वच्छता मोहिम राबविल्या जात होत्या. वेळोवेळी पुरातत्व विभागाच्या कार्यालयात गाठीभेटी घेऊन वखारीच्या दुरूस्तीसाठी निवेदने सुद्धा देण्यात आली होती. तर महाराष्ट्र राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेंगुर्ला डच वखारबाबतीत वेळोवेळी लिखाण करून या ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनाही पाचारण केले होते. या सगळ्या प्रयत्नांना यश आले असून वेंगुर्ला डच वखारीची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. जनेसवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पुरातत्व विभागाचे आभारी आहोत, असे मत जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत यांनी डच वखारीच्या दुरूस्ती कामाच्या प्रसंगी व्यक्त केले. यावेळी कंत्राटदार कर्मचारी कुमार जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu