सँड्रा फर्नाडिसला बेस्ट आऊट गोर्ईंग स्टुडंट अवॉर्ड

गूढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांच्या शोधकार्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फॉरेन्सिक सायन्स या केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विषयात 10 आऊट ऑफ 10 गुणवत्ता प्राप्त करीत सिंधुदुर्गातील सँड्रा शैलेस्तिन फर्नाडिस या विद्यार्थिनीने कर्नाटकातील श्रीनिवास विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सँड्राने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात विद्यापीठाच्या संस्थापिका सी. ए. राघवेंद्र यांच्या हस्ते बेस्ट आऊट गोर्ईंग स्टुडंट अवॉर्ड देऊन तिला गौरविण्यात आले. अशा प्रकारचा गौरव प्राप्त करणारी सँड्रा ही पहिली महाराष्ट्रीयन विद्यार्थिनी ठरली आहे. सँड्रा ही वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-सागरेश्‍वर येथील सॅम ॲण्ड सँड रिसॉर्टचे मालक शैलेस्तिन फर्नांडिस यांची  सुकन्या आहे.

      आवड व आकर्षणापोटीच तिने 12 वी सायन्स पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी फॉरेन्सिक सायन्स ॲण्ड क्रिमीनॉलॉजी हा पुरुषांची मक्तेदारी असलेला अतिशय चॅलेजिंग असा विषय निवडला. यामध्ये प्रचंड मेहनत घेत कर्नाटकातील धारवाड विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. विद्यापीठात फॉरेन्सिक विषयात प्रथम क्रमांक पटकावणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली होती.

 

Leave a Reply

Close Menu