उपजिल्हा रुग्णालय उभारणीचा धीमा वेग

सन 2018 मध्ये भूमिपूजन झालेल्या 50 खाटांच्या वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयासाठी 7 कोटी 25 लाख 34 हजार रुपये मंजूर होते. इमारत बांधकाम फेब्रुवारी 2019 पर्यंत 90 टक्के पूर्ण झाले. 12 मार्च 2019 रोजी उपअभियंता कुडाळ विद्युत विभाग ,सार्वजनिक बांधकाम विभाग ,सिंधुदुर्ग यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाच्या विद्युत जोडणी साठी 94 लाख 83 हजार 348 रुपये एवढ्या किमतीच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले .परंतु काम काही सुरू होईना . तब्बल दीड वर्ष विद्युतीकरणाचे काम रखडले. साप्ताहिक किरातसह प्रसारमाध्यमांनी या प्रश्‍नाला वाचा फोडली.आमदार केसरकर, खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या प्रयत्नांतून रुग्णालयाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून ट्रान्सफार्मरचे काम सुरू आहे. लिफ्टचे काम अद्याप प्रलंबित असून शासनाच्या निर्देशानुसार फायर ऑडिट झालेले नाही. फायर ऑडिट पूर्ण झाल्याशिवाय रुग्णालय इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही. त्यासाठी किमान आणखी 2 ते 3 महिने लागतील असा अंदाज आहे. त्यानंतर रुग्णालयासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे , डॉक्टर्स , वैद्यकीय कर्मचारी यांच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळणे प्रलंबित आहे. कोरोना आपत्ती काळात तरी तातडीने हे उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे ही जनतेची अपेक्षा आहे.

 

This Post Has One Comment

  1. ज्या सार्वजनिक प्रकल्पाचे ९० टक्के काम सव्वा दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले, त्याचे उर्वरित १० टक्के काम पूर्ण व्हायला एवढा विलंब लागतो याचा अर्थ संबंधित अधिकारी निकम्मे आहेत व लोकप्रतिनिधीं निष्क्रिय ! यांना तात्काळ निष्कासित करावे.

Leave a Reply

Close Menu