चंद्रकांत सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जि.प.प्राथमिक शाळा मठ नं.२चे पदवीधर शिक्षक डॉ.चंद्रकांत तुकाराम सावंत यांना ‘केओपी माझा मराठी‘कडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार प्रा.जयंत आसगांवकर, शिक्षक सहसंचालक संपत गायकवाड, राज्य कार्यकारी सदस्य कृष्णा हिरेमठ, शिक्षक महासंघाचे भरत रसाळ, मनोहर सरगर, दस्तगीर मुजावर, संजय पाटील, स्नेहलकुमार रेळेकर, राजेंद्र कोरे, प्रभाकर लोखंडे, सदाशिव साळवी, शंकर यादव, उपायुक्त कोल्हापूर रविकांत अडसूळ, मोहन गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu