इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन-कोल्हापूर शाखा, बॅ.खर्डेकर महाविद्यालय-वेंगुर्ला, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, नगरपरिषद वेंगुर्ला व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय नाट्यगृह येथे महिला व पर्यावरण या संकल्पनेवर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील यांच्या हस्ते व मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, डॉ.धनश्री पाटील यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात संगित शिक्षिका अनघा गोगटे, योग शिक्षिका साक्षी बोवलेकर, किरातच्या संपादक सीमा मराठे, डॉ.सुप्रिया रावळ, युवा नेतृत्व साहिली निनावे, संशोधक डॉ. स्मिता देशमुख, डॉ.मंगल कदम, क्रिकेट क्षेत्रातील अपूर्वा परब, मॅग्न्रृव्ह फाऊंडेशनच्या जागृती गवंडे, दुर्गा ठिगळे यांच्यासह स्वामिनी व ओमसाई महिला बचत गट यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.