►‘त्या‘ रिव्हॉल्वरबाबत शहरात नाराजी

वेंगुर्ल्यात नुकताच नुतन मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्विकारलेल्या डॉ.अमितकुमार सोंडगे यांचा सोमवारी (दि.१७) अजब फिल्मस्टाईल स्टंट नागरिकांना पाहायला मिळाला. शहराची ओळख करुन घेताना आपल्या कंबरेला बंदूक (रिव्हॉल्वर) अर्धी आत व अर्धी बाहेर अशी गँगस्टर स्टाईलने अडकवत बाजारासहीत इतर ठिकाणी त्यांनी फेरफटका मारला. याबाबत स्थानिक व्यापा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

      शांत आणि सुसंस्कृत शहरात एका प्रशासकीय अधिका-याने बंदूक घेऊन फिरणे हा प्रथमच पकार पाहायला मिळाल्याने या विषयाची शहरात सर्वत्र चर्चा सुरु आहे. वेंगुर्ला शहर हे गुंडांचे शहर नाही. त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही अशा प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. ही बाब व्यापारी, नागरिकांनी नगरसेवकांच्या कानावर घातली आहे.

 

This Post Has 2 Comments

  1. अरे बापरे..! ह्यांची बॅकग्राऊंड चेक केली होती का? कुठून आले आणि तिथे काय दर्जाचे काम केले आहे वैगेरे..?. ह्यांना वेंगुर्ल्यात सुरक्षित वाटत नाही का. मग सामान्य नागरिकांचं काय

  2. Punish him.
    Such people are problem for peace.
    Condemn his behaviour.

Leave a Reply to VINAY PATIL Cancel reply

Close Menu