►फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

अणसुर येथील संजय गावडे यांच्या बागेमध्ये २९ डिसेंबर रोजी सायंकाळी शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये एक बिबट्या अडकलेल्या स्थितीत आढळला होता. या घटनेची माहिती पोलीस पाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण, कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल चिरमे, नेरूर वनपाल कोळेकर, मठ वनरक्षक व्ही.एस.नरळे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पिज-यात पकडून आकेरी येथील वनविश्राम गृहावर नेले. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी अमृत शिंदे हे उपचार करीत होते. मात्र, ३० डिसेंबर रोजी बिबट्याचा मृत्यू झाला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मृणाल रेवटी हिने शवविच्छेदन केले. त्यानंतर आकेरी येथील शासकीय वनविभागाच्या जमिनीमध्ये त्याला वनविभागाने अग्नी देऊन अंत्यसंस्कार केल्याची माहिती वनरक्षक सावळा कांबळे यांनी दिली.

 

Leave a Reply

Close Menu