वेंगुर्ला शहराला ओडीएफ++ मानांकन

   

    स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत केंद्र सरकार कडून राबिविण्यात येत असलेल्या हागणदारी मुक्त शहरांच्या सर्वेक्षणात यशस्वीपणे प्रमाणित होऊन वेंगुर्ला शहराने ओडीएफ++ मानांकन मिळवले.

      बेंगुर्ला शहराने २०१६ पासून हागणदारी मुक्त शहर म्हणून आपले सातत्य टिकवण्यात यंदाही यश मिळवले आहे. *ओडीएफ++ मानांकित हागणदारी शहर म्हणजे काय?*  असे शहर ज्यात कोणतीही व्यक्ती उघड्यावर शौचास जात नाही, सर्व शहरवासीयांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहेशहरात लोकसंखेच्या प्रमाणात पुरेशी सामुदायिक व सार्वजनिक शौचालये आहेत. तसेच सर्व सामुदायिक तथा सार्वजनिक शौचालायापैकी २५% शौचालय सर्वोत्तम दर्जाची आहेत. शहरात निर्माण होणाऱ्या सर्व मैला साठीचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहेशहराचा स्वताचा स्वतंत्र मैला व सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित आहेशहरातील सर्व सार्वजनिक शौचालये गुगल नकाश्यावर (SBM TOILET) नोंदणीकृत आहेत.

        वरील निकषांचे मुल्याकन करण्यासाठी केंद्रीय पथकाने दि. १५ व १६ मार्च रोजी वेंगुर्लेत अचानक धडक दिली होती. त्यांनी केलेल्या पाहणीत वेंगुर्ला बाजारपेठवेंगुर्ला बस स्थानककॅम्प परिसरगिरपवाडाकुबलबाडाबंदर व मांडवी परिसर ई. परिसरांची तसेच सर्व सार्वजनिक शौचालये आणि वेंगुर्ल्याच्या सांडपाणी प्रकल्पांचे मुल्याकन करण्यात आले. त्यानंतर या पथकाद्वारे केंद्राकडे अहवाल सादर करण्यात आला होता. वेंगुर्ला नगरपालिकेने केलेले काम व हागणदारी मुक्त शहराचा दर्जा टिकवण्यासाठी केलेले नियोजन कामी आले व केंद्राला मिळालेला अहवाल सकारात्मक असल्याने वेंगुर्ला शहराला ओडीएफ++ शहर म्हणून प्रमाणित केले. शहराला ओडीएफ + + मानांकन प्राप्त झाल्याने कचरामुक्त शहरासाठी देण्यात येणारा ५ स्टार मानांकन दर्जा मिळवण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहेअशी माहिती स्वच्छ भारत अभियान वेंगुर्ला शहर समन्वयक सुस्मित चव्हाण यांनी दिली.

     वेंगुर्ला शहरास ओडीएफ++ दर्जा प्राप्त होण्यास वेंगुर्ला शहरवासीयांनी दिलेली साथ बहुमोल आहेशहरवासियांच्या व लोकप्रतिनिधींच्या एकजुट पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा वेंगुर्ल्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेल्याने आपण सर्वांचे आभार मानत असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितलेत्याचप्रमाणे असेच सहकार्य करून स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये वेंगुर्ला शहराला सर्वोत्तम क्रमांक मिळविण्यात हातभार लावावा असे आवाहन नगराध्यक्ष  गिरप आणि मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

 

 

This Post Has One Comment

  1. प्रतिक्रिया फेबुवर टाकली आहे.

Leave a Reply to ज. अ. रेडकर. Cancel reply

Close Menu