दहा वर्षांनी विद्युत प्रकाशाने उजळले घर

वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील नांदरुखवाडीमधील सदाशिव शांताराम केळुसकर यांना २०११ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासकीय योजनेची व इतरांकडून मदत घेऊन घर उभे केले. परंतु, घरामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी सात पोलची आवश्यकता होती आणि स्वखर्चाने त्याची प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी दहा वर्षे रॉकेलच्या दिव्यावर दिवस काढले होते. घरातील मुलेही दिव्याच्या उजेडातच शिक्षण घेत होती.

      दरम्यान, सदाशिव केळुसकर व सविता केळुसकर यांनी सदरची परिस्थिती वेंगुर्ला भाजपाच्या पदाधिका-यांसमोर आणली. त्यानंतर त्यांनी सतत पाठपुरावा करीत एम.एस.ई.बी.चे उपकार्यकारी अभियंता एल.बी.खटावकर, कनिष्ठ अभियंता गणेश तोंडले यांच्या सहकार्याने शासनाच्या योजने अंतर्गत ग्राहकाकडून कोणताही मोबदला न घेता सात पोलची उभारणी करुन त्यांच्या घरात विद्युत पुरवठा कार्यान्वित केला.

      केळुसकर यांच्या घरात विद्युत पुरवठा सुरु झाल्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, किसान मोर्चाचे बापू पंडित, शक्तीकेंद्र प्रमुख शामसुंदर मुणनकर, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर,    ग्रामपंचायत सदस्य सतिश कामत यांनी भेट देऊन ट्युब लाईट व इतर विद्युत साहित्य भेट दिली.

 

This Post Has One Comment

  1. गुड न्यूज

Leave a Reply to नंदू Cancel reply

Close Menu