वेंगुर्ल्यात ‘जनता कफ्र्यू‘ला प्रारंभ

        आमदार दीपक केसरकर व प्रशासनाकडून केलेल्या आवाहनानंतर वेंगुर्ल्यामध्ये आजपासून जनता कफ्र्यूला प्रारंभ झाला आहे.एरव्ही सकाळी ७ ते ११ या दरम्यान दिसणारी वर्दळ आजपासून बंद झाली आहे. त्यामुळे शहरातील चौक नागरिकांविना सूनेसूने दिसत होते.

           कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे वेंगुर्ल्यात दि.६ ते १५ मे या कालावधीत जनता कफ्र्यूचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजपासून कफ्र्यूला सुरुवात झाली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना पेट्रोल पंप, मेडिकल, दवाखाने आदी अत्यावश्यक सुविधांची दुकाने वळगता उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, सकाळी ६ ते ९ या वेळेत दूध विक्री  तर आंबा काढणी आणि वाहतूकीस मुभा असल्याने अशा वाहनांची शहरासह तालुक्यात ये-जा सुरु होती.

      तसेच वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे ठिकठिकाणी कडक बंदोबस्त सुरु असून ये-जा करणा-यांची चौकशीही केली जात आहे.

This Post Has One Comment

  1. लवकरात लवकर करोना जायला हवा

Leave a Reply to Ajay marathe Cancel reply

Close Menu