►वेंगुर्ला मच्छिमार्केटचे 11 रोजी लोकार्पण

वेंगुर्ला शहरातील बहुचर्चित अशा सुसज्ज मच्छिमार्केट इमारतीचे 11 जुलै ला केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आहे.
जिल्ह्रातील सर्व मच्छिमार्केटचा अभ्यास करुन त्यात राहिलेल्या त्रुटी लक्षात घेऊन हे मच्छिमार्केट उभारण्यात आले आहे. यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, फायर हायड्रेट सिस्टीम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कोल्ड स्टोरेज, दिव्यांग व वयोवृद्ध यांच्यासाठी रॅम्प व लिफ्टची व्यवस्था, सुसज्ज पार्किंग, चेंजिंग रुम, प्रत्येक माळ्यावर शौचालय व बाथरुमची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. याठिकाचा कचरा गोळा करुन पहिल्या व दुस-या मजल्यावरील कचरा थेट पार्किंगमध्ये बसवण्यात आलेल्या ट्रॉलीमधे जाणार आहे.

Leave a Reply

Close Menu