वेंगुर्ला येथील इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ल्याच्या २०२१-२२ या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा प्रमुख पाहुण्या तथा शपथ पदान अधिकारी विद्या करंदीकर हस्ते व प्रमुख अतिथी उमा पाटील यांच्या उपस्थितीत येथील साई मंगल कार्यालयात २१ जुलै रोजी पार पडला. यावेळी अध्यक्ष ज्योती देसाई, उपाध्यक्ष अफशान कौरी, सचिव स्मिता दामले, खजिनदार समिक्षा वालावलकर, आय.एस.ओ. वृंदा गवंडळकर, एडीटर पूजा कर्पे यांना तसेच नुतन सदस्या आरती गिरप, श्रीया परब यांना त्या त्या पदाची शपथ देण्यात आली. यावेळी व्यासपिठावर मावळत्या अध्यक्षा गौरी मराठे यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या, रोटरीचे अध्यक्ष सदाशिव भेंडवडे, सचिव सुरेंद्र चव्हाण, प्रा. वसंतराव पाटोळे, प्रा.आनंद बांदेकर, सई चव्हाण, अक्षया गिरप आदी उपस्थित होते.
इनरव्हील क्लब, वेंगुर्ल्याने सामाजिक जाणिवेतून महिलांसाठी चांगल्या स्वरुपाचे समाज उपयोगी कार्यक्रम राबवून महिलांना सेवा देण्याचे काम करावे. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन नियम पाळून कार्यक्रम घ्यावेत. असे प्रतिपादन शपथ प्रदान अधिकारी विद्या करंदीकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोना योध्दा म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, न.प.च्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, आरोग्य सेविका विनीता तांडेल, डॉ.पुजा कर्पे, डॉ.अफशान कौरी यांचा सत्कार करण्यात आला. वेंगुर्ला न.प.च्या स्वच्छता कर्मचा-यांना व्हिटॅमीन सी व बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ.पुजा कर्पे यांनी तर आभार स्मिता दामले यांनी मानले. हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन संपन्न झाला.