दिव्यांग सचिन पालव हार्मोनियम विशारद

वडखोल येथील सचिन भालचंद्र पालव या 32 वर्षिय दिव्यांग युवकाने गुरुदास मुंडये व ऋषिकेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हार्मोनियम विशारद पदवी पूर्ण केली आहे. त्याने 800 पैकी 618 गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या परीक्षेमध्ये सचिनला लेखनिक म्हणून नितिन कुळकर्णी यांनी काम पाहिले. सचिनचे चारही विषयामध्ये विशारद होण्याचे स्वप्न आहे. डॉ.सुधांशू कुलकर्णी यांच्याकडे शिकण्याची त्याची प्रबळ इच्छा आहे. पण सध्या आजारपणामुळे व घरच्या गरिबीमुळे ते त्याला शक्य नाही. सचिनने अंधत्वावर मात करुन आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे केले आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu