दिवंगत अभिनेत्री गीतांजली कांबळी यांच्या वाढदिवसादिनी नवीन मालवणी नाटक ‘माझ्या देवाक काळजी रे‘ याचे क्रोमोप्लेक्सचे अनावरण वेंगुर्ला पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामदास पारकर व जादूगार वैभवकुमार आदी उपस्थित होते.
सध्या कोरोना काळात व्यवसाय बंद पडलेत. रोजगार गेले. त्यामुळे चाकरमानी मूळ गावी येऊ लागले.गावच्या जमिनी व मूळपुरुष याची आठवण पुन्हा त्यांना होऊ लागली आहे. हीच थीम घेत मुळातच आपल्या मूळपुरुषाचा विसर पडू देऊ नका हा संदेश देणारे मालवणी थमाल विनोदी नाटक प्रदीर्घ विश्रांतीने येत आहे. या नाटकाच्या रियलसर मुंबई येथेच होणार आहेत. मालवणी नाटकाला प्रेक्षक दाद देतील असा विश्वास मालवणी नटसम्राट लवराज कांबळी यांनी वेंगुर्ला सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.