शिरोड्यात तिरंगा मोटरसायकल रॅली

भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील शिरोडा ग्रामपंचायत हद्दीत ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला त्याठिकाणी म्हणजे नियोजित गांधी स्मारक येथे २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान तसेच तिरंगा मोटरसायकल रॅली कार्यक्रम संपन्न झाले. नरेंद्रनाथ संप्रदायचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण उगवेकर यांनी महात्मा गांधींची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. यावेळी भारत माता की जयवंदे मातरममहात्मा गांधींचा विजय असो असा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

      जेष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यांनी येथील महात्मा गांधींच्या आदेशानुसार झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईजिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईकवसंत तांडेलतालुका सरचिटणीस बाबली वायंगणकरमच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष दादा केळूसकरमनवेल फर्नांडिसमाजी जि.प.अध्यक्ष निकिता परबशिरोडा सरपंच मनोज उगवेकररेडी सरपंच रामसिंग राणेआरवली सरपंच तातोबा कुडवतालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पेशिरोडा उपसरपंच राहुल गावडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu