प्रबोधन गोरेगांव व माझा वेंगुर्लायांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. खर्डेकर महाविद्यालयात लघुपट निर्मिती आणि मार्केटींग व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चित्रपट परीक्षक व समीक्षक अशोक राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार व तंत्रज्ञ मनोज राणे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संचालक गोविंद उर्फ विजू गावडे, ‘माझा वेंगुर्लासंस्थेचे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, कलावलय संस्थेचे संजय पुनाळेकर आदी उपस्थित होते.

        प्रबोधन गोरेगांव या संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त मराठी माणसांना लघुपट चित्रपट सृष्टीत पुढे आणण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुपट निर्मिती व मार्केटींगसाठी जी स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेत सहभाग घ्यावा. याकरीता आपल्या सिंधुदुर्ग जिह्यासाठी वेंगुर्ल्यात जी कार्यशाळा राबविली आहे ती महत्त्वाची आहे. या लघुपट निर्मिती स्पर्धेत या जिह्यातील युवक व युवतींनी कार्यशाळेतील मार्गदर्शनानुसार सहभाग घ्यावा. असे प्रतिपादन वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.

      प्रबोधन गोरेगाव ही संस्था गेली असंख्य वर्षे कला, क्रिडा, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम राबवित आहे. यावेळी जगातील मराठी माणसांना लघुपट चित्रपट सृष्टीत पुढे येण्यासाठी सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर लघुपट निर्मिती व मार्केटींग व्यवस्थापन या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आपले गाव हे अणसूर-पाल असल्याने आपण शिक्षण घेतलेल्या खर्डेकर महाविद्यालयात यासाठी कार्यशाळा राबविण्याचे ठरविले. त्यानुसार माझा वेंगुर्लासंस्थेने व खर्डेकर महाविद्यालयाने त्यासाठी सहकार्य केल्याबद्दल विजू गावडे यांनी त्यांचे आभार मानले.

      यावेळी माझा वेंगुर्लासंस्थेचे राजन गावडे, अवधुत नाईक, प्रा. आनंद बांदेकर, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, प्रा.वसंतराव पाटोळे, सुरेंद्र चव्हाण, जे.जे. आर्ट कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुनिल नांदोस्कर, वसंत तांडेल, प्रा.वामन गावडे आदी उपस्थित होते.

      निलेश चेंदवणकर, राजन गावडे, वसंत तांडेल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर कलावलयचे संजय पुनाळेकर यांनी मान्यवरांचा परीचय, प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.

Leave a Reply

Close Menu