अदिती पै यांनी व्यक्त केली कृतज्ञता

वेंगुर्ला कॅम्प येथील बॅ.नाथ पै समुदाय केंद्रासाठी न.प.कौन्सिलमध्ये कायदेशीर ठराव होणे गरजेचे होते. सदर ठराव माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व त्यांच्या सर्व नगरसेवकांनी तत्काळ करुन सहकार्य केल्याबद्दल बॅ.नाथ पै फाऊंडेशनच्या अध्यक्षा अदिती पै यांनी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या घरी भेटदेऊन कृतज्ञता व्यक्त केली. बॅ.नाथ पै आणि दिलीप गिरप यांचे सासरे नारायण तारी हे त्या काळातील जुने मित्र होते. त्यामुळे अदिती पै यांनी दिलीप गिरप यांच्या पत्नी अक्षया गिरप यांच्याकडून त्या काळातील आठवणी व माहिती जाणून घेतली. यावेळी उमेश गावळणकर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu